'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रह्मपुरी: दलीत मित्र स्व.श्रीरामजी धोटे व स्व.कमलताई धोटे यांच्या अर्धाकृती पुतड्याचे अनावरण | Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Bramhapuri News,
दलीत मित्र स्व.श्रीरामजी धोटे व स्व.कमलताई धोटे यांच्या अर्धाकृती पुतड्याचे अनावरण

ब्रह्मपुरी
: आधुनिक किसान शिक्षण संस्था ब्रम्हपुरी द्वारा संचालित कर्मवीर कन्नमवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सूरबोडी येथे शाळेचे मुख्य संचालक दलीत मित्र स्व. श्रीरामजी धोटे व त्यांच्या सहचारिणी संस्थेच्या सदस्या स्व.कमलताई धोटे यांच्या अर्धाकृती पुतळ्यांच्या अनावरणाच कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य.डॉ.देविदास जगनाडे यांनी दोन्ही वेक्तीच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला या कार्यक्रमाला स्व. श्रीरामजी धोटे यांचे मित्र श्री.नारायणजी बोकडे तसेच ऍडो.गोविंदराव भेंडारकर प्रा .अनिल कोडपे सर , माजी प्रा.दिगंबर पारधी सर,श्री नामदेवराव ठाकूर,श्री केडझरकर सर तसेच संस्थेचे सचिव प्रा. इसनजी देसाई व संस्थेचे पदाधिकारी , व मुले ,सुना, मुली,जावई,नातवंडे तसेच इसापूर इटखेडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते .उपस्थित सर्व पाहुण्यांचा प्रा.श्री.संदीप ढोरे सर,करणकर जी आणि त्यांची चमू यांनी शब्द सुमनानी स्वागत केले.तर श्री . सूनीलजी बगमारे सर यांनी श्रीरामजी धोटे साहेब यांच्या जीवनावर आधारित कवितेचा वाचन केलं,

स्व.श्रीरामजी धोटे व  स्व.कमलताई धोटे यांच्या जीवन चरित्रावर व कार्यावर सर्व मान्यवरांनी प्रकाश टाकला त्याच प्रमाणे पुतळा दान करणारी ku. श्वेता ज्योती व संजय धोटे हीचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य.श्री धोटे सर कु.ज्योती मॅडम पिलारे सर कऱ्हाडे सर कू.भारती मॅडम व सर्व कर्मचारी व विद्यार्थानी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×