Accident: लग्न आटोपून परतताना कारची ट्रॅक्टरला धडक, पाच जणांचा मृत्यू | Batmi Express

लग्न आटोपून परतताना कारची ट्रॅक्टरला धडक, पाच जणांचा मृत्यू,Washim,Washim News,Washim Accident,Accident News,Accident,

लग्न आटोपून परतताना कारची ट्रॅक्टरला धडक, पाच जणांचा मृत्यू,Washim,Washim News,Washim Accident,Accident News,Accident,
लग्न आटोपून परतताना कारची ट्रॅक्टरला धडक, पाच जणांचा मृत्यू

Washim
| लग्नासाठी गेलेले कुटुंबिय घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की जागीच चौघांचा मृत्यू झाला. तर एकाची प्राणज्योत उपचारावेळी मालवली.  या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील ६ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

एकाच कुटुंबातील काही लोक मंगळवारी रात्री नागपूरमध्ये असलेलं लग्न आटोपून परत येत होते. रात्री नऊच्या सुमारास शेलुबाजार-वाशिम मार्गावर सोयता फाट्याजवळ रस्त्यावर उभा असलेल्या ट्रॅक्टरला कार धडकली. यात कारचा चुराडा झाला आहे. 

अपघातात वाशिम तालुक्यातील सावंगा जहाँगिर येथील भारत गवळी(वय ४०), सम्राट गवळी (वय १२) आणि पुनम गवळी (वय ३७) यांच्यासह पाच जण मृत्यूमुखी पडले. गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते अशीही माहिती समोर येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.