मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 6 वाहनांच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू |
Mumbai - Pune Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज पहाटे मुंबईच्या दिशेनं येणारी ६ वाहनं बोरघाटात एकमेकांना धडकली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण जखमी आहेत. त्यापैकी तिघांची परिस्थिती गंभीर असल्याचं समजत आहे. जखमींवर नवी मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात चार जण जागीच दगावले आहेत. तर आठजण जखमी झाले आहेत.
अपघातात सहा वाहनांनी एकमेकांना धडक दिली. एक्सप्रेसवेवरुन जाणाऱ्या एका कंटेनरने पुढे जाणाऱ्या स्विफ्ट कारला धडक दिली. स्विफ्ट कार तिच्यापुढे जाणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळली.
स्विफ्ट कारनं दिलेल्या धडकेमुळं टेम्पो त्याच्यापुढे जात असलेल्या कारवर जाऊन आदळला. या कारच्यापुढे आणखी एक कंटेनर जात होता, ही कार त्या कंटेनरवर जाऊन आदळली. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या वाहनांचा बोरघाटात भीषण अपघात झाला.
अपघात इतका भीषण होता की, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघात झाल्यानंतर जखमींना तत्काळ नवी मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.