CSTPS येथे कामगाराचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद |
Chandrapur Tiger Exclusive: चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात एका कामगाराचा बळी घेणाऱ्या पट्टेदार नर वाघाला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पकडण्यात आले आहे. वन्यजीव विभागाचे मुख्य वन संरक्षक यांनी वीज केंद्रातील ४ वाघांना पकडण्याचे आदेश दिले होते. ( CSTPS येथे कामगाराचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद )
त्यानंतर वन पथक या वाघांचा शोध घेत होते. रात्री उशिरा ९.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीज केंद्र ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे चंद्रपूर वीज केंद्र विशेष पथक आणि वनविभागाची संयुक्त मोहिम सुरू असताना वाघ दिसला. त्याला शूटर अजय मराठे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डॉट मारला. यात वाघ बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला पकडण्यात वन खात्याला यश आले.
मागील काही वर्षांपासून सीएसटीपीएस परिसरात वाघांचा वावर वाढला आहे.अश्यातच एका 55 वर्षीय मजुराला भक्ष्य केले. तर दुर्गापूर नेरी परीसरात बिबट्याने एका 16 वर्षीय युवकाला उचलून नेले.त्यामुळे सर्वत्र दहशत पसरली.प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेऊन सर्व लोकप्रतिनिधींनी या वाघांचा बंदोबस्त करा,अशी मागणी लावून धरली.यात ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत,राज्यमंत्री तनपुरे,लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
वाघ पकडला अशी माहिती मुख्य वन संरक्षण एन.आर. प्रवीण, वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी दिली.