Chandrapur Accident: कोरपनात दुचाकी व मालवाहू पिकअप भीषण अपघात...एक जागीच ठार दोन गंभीर...

Korpana,Accident,Accident News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,

Korpana,Accident,Accident News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,
कोरपनात दुचाकी व मालवाहू पिकअप भीषण अपघात
  • एक जागीच ठार दोन गंभीर
कोरपना:- कोरपना पोलीस स्टेशन हद्दीतील 21 फेब्रुवारी सायंकाळी सात वाजता ची घटना असून चंद्रपूर आदिलाबाद मार्गावर कोरपणा पावर हाऊस जवळील घटना असून सदर घटनेत दुचाकी क्रमांक एम एच 34 बीपी 5988 स्प्लेंडर व मालवाहू पिक अप क्रमांक एपी 01 -T-6449 भीषण टक्कर होऊन पिक अपने दुचाकीला फरफटत नेले. ( Two-wheeler and cargo pickup in Korpana )

दुचाकीवरील जगदीश कोरांगे वय 25 राहणार पिटगव्हाण मंडळ बेला जिल्हा आदीलाबाद याचा घटनास्थळीच मृत्यू झाला व मामा, भाचे शंकर मलकु कोडापे वय 32 व रुपेश रावजी मेश्राम वय 25 वर्ष. रा. रामपूर तह कोरपणा जिल्हा चंद्रपूर दोघा च्या पायाला गंभीर दुखापत झाली.
सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन कोरपना मिळताच पोह खोब्रागडे पोशी विनोद पडवाल घटनास्थळी दाखल होऊन गन गंभीर जखमी यांना उपचारासाठी कोरपणा येथे उपचारासाठी दाखल केले व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे आणले. दोघांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरला पाठवण्यात आले पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनात कोरपना पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.