'
30 seconds remaining
Skip Ad >

वाह रे उध्दव तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, असे म्हणत भाजपच्या महिलांचा जोरदार मोर्चा आणि घोषणाबाजीसह दिले मुख्यमंत्र्यांना पत्र

0

वाह रे उध्दव तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल,Dhule,Dhule News,Maharashtra,
वाह रे उध्दव तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल

धुळे
: महाराष्ट्राला केवळ महसूल मिळावा या करिता महाराष्ट्रातील राज्य सरकारने इतर राज्यांप्रमाणे किराणा दुकानात वाईन विक्री करण्याची मुभा दिली आहे. ही बाब निषेधार्य असून या निर्णयाने भावी पिढी बर्बाद होईल. त्यांना दारूचे व्यसन लागेल. महिला-भगिनींचा संसार उध्वस्त होईल, परिणामी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने केली आहे. तर, त्यांनी धुळे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिससमोर निदर्शने करीत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आघाडी सरकारचा जाहीर निषेध नोंदविला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात बॅनर घेवून करण्यात आलेल्या घोषणाबाजीने पोस्ट ऑफिस कार्यालय परिसर दणाणून गेला होता. यात बॅनरवर ‘वाह रे उध्दव तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’, किराणा दुकानात वाईन विक्री करून युवकांना वाम मार्गाला लावण्याच्या तिघाडी सरकारचा निषेध असो, आदी घोषवाक्य लिहिलेली दिसून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×