लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात |
नांदेडमध्ये विवाह सोहळा उरकून नववधूला घेऊन जात असताना टाटा मॅजिक आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात टाटा मॅजिक गाडीमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२१ फेब्रुवारी) सायं. ६ वाजताच्या सुमारास भोकर-हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत.
दरम्यान, हा अपघात एवढा भयानक होता की अक्षरशः दोन्ही वाहनाचा चुराडा झाला आहे. या अपघातस्थळी मृतांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर केला जात आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.