गडचिरोली: विविध क्रीडांच्या माध्यमातून युवकांनी जिद्द, चिकाटी सारखे गुण अंगीकारून भविष्य घडवावे - महेंद्र ब्राम्हणवाडे

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Live News,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,
 विविध क्रीडांच्या माध्यमातून युवकांनी जिद्द, चिकाटी सारखे गुण अंगीकारून भविष्य घडवावे

  • क्रांतिसूर्य बघवान बिरसा मुंडा युवा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन

गडचिरोली ( Gadchiroli ):- चांदाळा येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा युवा मंडळ, चांदाळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हानिरीक्षक डॉ.नामदेवराव किरसान उपस्थित होते. 

विविध क्रीडांच्या माध्यमातून युवकांनी जिद्द, चिकाटी, संघटन, सारख्या असंख्य गुणांचा आत्मसात करून स्वतःचा भविष्य घडवावे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. मुख्य अतिथी म्हणून सरपंच सुनीता गेडाम,  जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, संजय चन्ने, मदन मडावी, हिरापूर चे सरपंच दिवाकर निसार, सुरेश बांबोळे, संजय खोब्रागडे, अशोक नैताम, आनंदराव कुमरे, ग्रामसेवक विलास दुर्गे, राजेंद्र मेश्राम, सुभास किरंगे, गजानन मेश्राम, मोरेश्वर कोराम, मोरेश्वर नैताम, नरेशजी कुमरे, उमाजी किरंगे, शालीक बारसागडे, नरेंद्र कुमोटी, माणिक मडावी, हेमंत ढोक, नरेंद्र मडावी, विलास कुमरे, मुख्याध्यापक मुळे, ढिवरु मेश्राम आदी मान्यवर व कबड्डीच्या सहभागी चमू यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.