'
30 seconds remaining
Skip Ad >

Accident | भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू | Batmi Express

0

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील अनंतपूरम जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.  मृत व्यक्ती या एकाच कुटुंबातल्या असल्याचं समजते. कर्नाटकातील बेल्लारीहून ते त्यांच्या गावी परत येत असताना ही दुर्घटना घडली. एका वेगाने येणाऱ्या लॉरीला त्यांची गाडी धडकल्यानं हा अपघात झाला. ( Terrible accident 9 members same family die )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतपूरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावर कोटलापल्लीजवळ दुर्घटना घडली. 9 मृतांमध्ये सहा महिलांसह एका लहान मुलाचा समावेश आहे.

हे देखील वाचा:

यवतमाळ | शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; वॉर्डनने दुर्लक्ष केल्याचा आरोप 

उरावाकोंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्यंकट स्वामी यांनी सांगितले की, कारची लॉरीला धडक बसली. यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. या अपघाताची अधिक चौकशी आणि तपास पोलीस करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×