चंद्रपुर | जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News Live,Chandrapur News IN Marathi,Rajura,Chandrapur Today,Chandrapur Live,जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News Live,Chandrapur News IN Marathi,Rajura,Chandrapur Today,Chandrapur Live,जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
चंद्रपुर | जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

राजुरा
:- विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानोरा परिसरात गस्त करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे विरूर पोलिसांनी धानोरा येथे धाड टाकून जुगार खेळत असतांना रंगेहात पकडून सात आरोपीना अटक करण्यात आली.

हे देखील वाचा:

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

यात आरोपीची झडती घेऊन एकूण दोन हजार नव्वद जप्त करण्यात आले. यातील आरोपी किशोर सखाराम जुलमे वय वर्ष 47,राजू पांडुरंग गाव्हारे वय वर्ष 33,भारत बाबुराव मेश्राम वय वर्ष 35, रामदास महादेव मडावी वय वर्ष 30, प्रभाकर विश्वनाथ मोरे वय वर्ष 40, अरविंद विठोबा दरवेकर वय वर्ष 30, सुरज बंडू टेकाम वय वर्ष 26, हे सर्व रा. धानोरा ता. राजुरा. जि. चंद्रपूर यांना जुगार खेळताना पकडण्यात आले.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस हवालदार भुजंगराव कुरसंगे, सचिन थेरे, सुरेंद्र काळे, प्रमोद मिलमिले यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.