दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार |
मुंबई : दहावी (10th) बारावीच्या (12th) विद्यार्थ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दहावी - बारावीच्या ऑफलाईन परीक्षे संदर्भात आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण चित्रच आखिकार स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सर्व दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना आता अभ्यासाकडे कसून लक्ष देणे गरजेचं आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ऑनलाइन कराव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसांत झाली. मात्र या सगळ्यावर आता सुप्रीम कोर्टानं अंतिम निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार दहावी बारावी परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाईनच होणार आहे.
सुप्रीम कोर्टात ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचा अंतिम निर्णय कोर्टानं दिला आहे.
सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय स्टेट बोर्ड (State Board), CBSE, ICSE आणि National Institute of Open Schooling (NIOS) या सर्वांसाठी लागू करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या याचिका या विद्यार्थ्यांना चुकीच्या आशा दाखवत असल्याची फटकारही सुप्रीम कोर्टानं लगावली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.