पौष्टिक आहाराच्या नावाखाली प्लॅस्टिकचे तांदूळ |
प्राप्त माहितीनुसार,चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत उसगाव येथील जिल्हा परिषदच्या उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी २१ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून शासनातर्फे आलेले धान्य वितरित करण्यात आले. या तांदळातील काही तांदूळ न शिजल्याने त्याची तक्रार पालकांनी मंगळवारी २२ फेब्रुवारीला सरपंच निविदा ठाकरे यांचेकडे केली.
हे देखील वाचा:
ठाकरे यांनी चाचपणी केली असता तक्रारीत सत्य आढळून आले. पौष्टिक आहारातील तो तांदूळ भिजला नाही परंतु तो तव्यावर टाकला असता वितळल्याने तो प्लास्टिकचा तांदूळ असावा अशी चर्चा उसगाव येथे आहे. हा संपूर्ण प्रकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ आहे, याची चौकशी करावी अशी मागणी सरपंच निविदा ठाकरे यांनी केली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.