Nagpur News: पत्नीला नोकरी करण्यास सांगणे हिंसाचार नाही : कुटुंब न्यायालयाचा निर्णय महत्वपूर्ण निर्णय - Batmi Express

Nagpur LIve News,Nagpur LIve,Nagpur Live Coverrage,nagpur news,Nagpur,Nagpur Today,crime Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Crime,

Nagpur LIve News,Nagpur LIve,Nagpur Live Coverrage,nagpur news,Nagpur,Nagpur Today,crime Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Crime,
पत्नीला नोकरी करण्यास सांगणे हिंसाचार नाही : कुटुंब न्यायालयाचा निर्णय महत्वपूर्ण निर्णय

नागपूर ( Nagpur ) : 
पतीने पत्नीला नोकरी करण्यास सांगणे कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही. या कृतीवरून पतीला पत्नीचे सशक्तीकरण व विकास करायचा असल्याचे दिसून येते. पतीने पत्नीला स्वत:च्या पायावर उभे होण्यास प्रेरित करणे चांगली बाब आहे, असे कुटुंब न्यायालयाने एका प्रकरणावरील निर्णयात नमूद केले.

Read Also:

गडचिरोलीत अल्पवयीन मुलीसोबत जरबरदस्तीने लग्न करून केला विनयभंग

प्रकरणातील दाम्पत्य नागपूर येथील रहिवासी असून, त्यांचे २०१५ मध्ये लग्न झाले. मतभेदामुळे ते काही वर्षांनंतर विभक्त झाले. दरम्यान, पत्नीने कुटुंब न्यायालयात खावटीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यात तिने पती नोकरी करण्यास सांगतो. सासू सकाळी ५ वाजता उठवून घरकाम करायला लावते, असे आरोप केले होते.

न्यायालयाला या आरोपांमध्ये गुणवत्ता आढळून आली नाही. याशिवाय पत्नी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्याचे आणि तिला चांगले वेतन मिळत असल्याचे रेकॉर्डवर आल्यामुळे तिला खावटीही नाकारण्यात आली. पतीच्या वतीने ॲड. श्याम आंभोरे यांनी कामकाज पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.