अर्बन बँकेत १५० कोटींचा घोटाळा; संचालक मंडळ, अधिकाऱ्यांसह इतरांविरुद्ध गुन्हा
Ahmednagar: नगर अर्बन मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये सन २०१४ ते २०१९ या कालावधीत १०० ते १५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार व अपहार केला, तसेच संगनमताने बनावट मूल्यांकन करून ठेवीदार, खातेदार, सभासद यांचे नुकसान केले.
या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, बँकेचे अधिकारी तसेच आशुतोष सतीश लांडगे, सचिन गायकवाड, रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी व बँकेच्या मुख्य शाखेतील व्यवस्थापक अच्युत घनश्याम बल्लाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Read Also:
|गडचिरोलीत अल्पवयीन मुलीसोबत जरबरदस्तीने लग्न करून केला विनयभंग
यासंदर्भात बँकेचे सभासद राजेंद्र ताराचंद गांधी (कोहिनूर गार्डन, माळीवाडा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. बँकेतील गैरव्यवहारासंदर्भात गांधी यांनी यापूर्वीही रिझव्र्ह बँक, केंद्रीय सहकार निबंधक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
त्यांनी दखल न घेतल्यामुळे दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका (१२२४ /२०२०) दाखल केली. त्याची सुनावणी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी काल, गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.