मौजा चीचोली बुज.येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली
ब्रह्मपुरी: आज दिनांक 19.फेब्रू.2022 रोज शनिवारला मौजा चीचोली येथे शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरवात दिनांक 18 फेब्रु.पासून करण्यात आली या प्रसंगी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात चमचा गोडी,संगीत खुर्ची,रांगोळी स्पर्धा,आणि रात्रीला लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
दिनांक 19 फेब्रू.ला.सकाळ ला.संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन गजाननजी ढोरे सरपंच अध्यक्ष म्हणून प्रा. दामोधरजी शिंगाडे,प्रमुख वक्ते म्हणून श्री.मोंटूभाऊ पिलारे ब्रम्हपुरी श्री.सूरज चौधरी, कोंढाळा श्री राऊत सर,प्रा. संदीप ढोरे सर, तंटामुक्त अध्यक्ष श्रीहरि लांडगे उपसरपंच श्री.रामलालजी ढोरे , रघुनाथजी पारधी माजी.पो.पा.सर्व ग्रापंचायतसदस्य तथा तंटामुक्त समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य .मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते.
शिवजयंती महोत्सव साजरा करण्याचा हेतू उद्देश प्रास्थाविकातून प्रा. संदीप ढोरे सर यांनी मांडला मार्गदर्शक पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे संचालन शिवदासजी बुल्ले यांनी केले कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वितरण करून करण्यात आली. या कार्यक्रमात शिवजन्मोत्सव समिती चे सर्व पदाधिकारी संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित होती.