नागपुरची मिरची झाली तिखट!
नागपूर (Nagpur News ) : मध्य भारतामध्ये नागपूरच्या कळमना मार्केट सर्वात मोठा मार्केट आहे. कळमना मार्केट मधून संपुर्ण मध्य भारतात व मोठ्या मोठ्या कंपनीला लाल मिरची पाठवल्या जातात. या वर्षी लाल मिरची आवक खूप कमी झाली असून, मिरचीच्या उत्पादनामध्ये पण घसरण दिसत आहे. नागपूरच्या APMC मार्केटचे व्यापारी सांगतात की, दर वर्षी या काळात 40 हजार पोत्यांची आवक असते.
परंतू मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरचीच्या शेतीला खूप मोठा फटका बसला असून, मिरचीची आवक खूप कमी झाली आहे. एकीकडे जिथे आवक कमी झाली तर दुसरीकडे मिरचीचे दाम ही दुप्पट झाले आहेत. मागील दोन महिन्या आधी मिरचीचा 130 रुपये प्रति किलो भाव होता. तर आज मिरचीचा हाच भाव 200 रुपये प्रति किलो पर्यंत पोहचला आहे. येणाऱ्या काळात हा मिरचीचा भाव अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं देखील मिरचीचे व्यापारी वसंत पटले, यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अवकाळी पाऊस आणि कमी उत्पादन यामुळं लाल मिरची भविष्यात आणखी तिखट होणार आहे. त्यामुळं कोरोना आणि लॉकडाऊन यामुळं आधीच मेटाकुटीला आलेला सामान्य नागरिक मिरची महागाईमुळं लाल मिरची आणखी तोंडाला फेस काढत, भाववाढीमुळं तोंडाचे हा..हू..हा होणार आहे, एवढे मात्र नक्की.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.