दीर-भावजयची भर रस्त्यात घट्ट मिठी मारत आत्महत्या | Deer-Bhavjay's suicide by hugging tightly in the street | Batmi Express

Aurangabad,Aurangabad Suicide,suicide news,suicide,Maharashtra,दीर-भावजयची भर रस्त्यात घट्ट मिठी मारत आत्महत्या, Deer-Bhavjay's suicide by hug tight

Aurangabad,Aurangabad Suicide,suicide news,suicide,Maharashtra,दीर-भावजयची भर रस्त्यात घट्ट मिठी मारत आत्महत्या, Deer-Bhavjay's suicide by hug tight
दीर-भावजयची भर रस्त्यात घट्ट मिठी मारत आत्महत्या

विष प्राशन केल्याने  चक्कर येत असल्यानं दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. काही क्षणांत खाली कोसळले. हात-पाय तडफडत होते. दोघांनाही उलट्या होऊ लागल्या. एकदम कोसळल्याने दोघांचेही मोबाईल बाजूलाच पडले.

Aurangabad Suicide | जिल्ह्यातील करमाड परिसरात एक धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बिल्डिंगसमोर विष प्राशन करून एक प्रेमी जोडपे आले होते. 

विष प्राशन केल्याने  चक्कर येत असल्यानं दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. काही क्षणांत खाली कोसळले. हात-पाय तडफडत होते. दोघांनाही उलट्या होऊ लागल्या. एकदम कोसळल्याने दोघांचेही मोबाईल बाजूलाच पडले. परिसरातील नागरिकांनी या दोघांची अवस्था पाहून तत्काळ पोलिसांना आणि  रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर या दोघांनाही मृत घोषित केलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे दीर-भावजय होते. करमाड पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वीच सदर महिला सत्यभामा कदम ही तिच्या बहिणीसह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. सत्यभामा कदम ही गोलटगाव येथील बहिणीकडे मुलाच्या वाढदिवसासाठी आली होती. 

तेव्हापासून दोघी बहिणी बेपत्ता होत्या. दोन दिवसांपूर्वी बहिणीचा शोध लागला. तेव्हापासून सत्यभामा यांचा पोलीस शोध घेत होते.  सत्यभामा कदम यांचे चुलत दीर काकासाहेब याच्यासोबत प्रेमसंबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. करमाड पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.