BJP MLA Suspension | भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन अखेर मागे, राज्य सरकारचा निर्णय! | Batmi Express

Be
0

Maharashtra,Maharashtra Live,Maharashtra News,Maharashtra Today,Mumbai,Mumbai Live,Mumbai News,mumbai news live,mumbai news today,mumbai news today live,
भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन अखेर मागे, राज्य सरकारचा निर्णय!

Mumbai | गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या 12 भाजपा आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं देखील यासंदर्भात निलंबन कायदेशीर नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर हे निलंबन मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारवर दबाव वाढू लागला होता. अखेर हे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील वाचा:

आत्महत्या | प्राॅमीस डे ‘च्या दिवशी विष प्राशन करून प्रेमीयुगुलाची आत्महत्या, गोंदिया येथील हॉटेल एव्हरग्रीन मधील घटना

गेल्या आठवड्यात 28 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. यामध्ये 12 आमदारांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली होती. 

आमदारांविरोधात 60 दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबनाची कारवाई करण्याचा विधानसभेला अधिकार नाही. मात्र, भाजपच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. वर्षभर निलंबित करणे ही लोकप्रतिनिधीच्या हकालपट्टीपेक्षाही गंभीर शिक्षा म्हणावी लागेल, असे ताशेरे न्यायालयाने गेल्या वेळी झालेल्या सुनावणीत ओढले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->