'
30 seconds remaining
Skip Ad >

आत्महत्या | हॉटेल एव्हरग्रीन लॉजमध्ये 'प्राॅमिस डे' दिवशीच प्रेमी युगुलाची आत्महत्या | Batmi Express

0

Gondia,Nagpur Suicide,suicide news,nagpur news,Gondia Suicide,suicide,Nagpur,gondia news,Gondia Marathi News,Gondia Live News,
हॉटेल एव्हरग्रीन लॉजमध्ये 'प्राॅमिस डे' दिवशीच प्रेमी युगुलाची आत्महत्या

गोंदिया  ( Gondia ) | शहरातील हॉटेल एव्हरग्रीन मध्ये काल रात्री एका प्रेमी युगलाने आत्महत्या ( Couple Suicide ) केल्याने खळबळ उडाली असून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या‌ केली असून सदर आत्महत्या कुठल्या कारणातून झाली याचा शोध गोंदिया ग्रामीण पोलिस घेत आहेत.

नागपुरातील ( Nagpur ) 21 वर्षीय रोहिणी पवार व गोंदियातील (Gondia )  22 वर्षीय आकाश छेतीया हे दोघे जण काल या हॉटेलमध्ये मुक्कामी आले होते. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या मुलाने आपण हॉटेल एव्हरग्रीन मध्ये असल्याची माहिती आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला दिल्याने मृत युवकाच्या आईने एव्हरग्रीन हॉटेल गाठत वेटर च्या मदतीने रूम मध्ये जाऊन पहिले असता आकाश आणि रोहिणी हे दोन्ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.

दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गोंदियातील हॉटेल व्यावसायिक तरुण तरुणींना आपला स्वार्थ साधण्यासाठी खोली उपल्बध करून देत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत. तर या घटनेनंतर गोंदिया पोलिस हॉटेल व्यवसायिकांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×