चंद्रपूर | राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि.3 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता नवीन पद्मशाली भवन, कन्या शाळेजवळ, सिंदेवाही येथे पद्मशाली समाजाच्या वतीने आयोजित नवीन पद्मशाली भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12 वाजता सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.
हे देखील वाचा:
|आत्महत्या | भंडारा हादरलं ! कॉलेजमधून येताच बारावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
शनिवार, दि. 5 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंतचा कालावधी शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे अभ्यागंतासाठी राखीव. व शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे मुक्काम.