चंद्रपूर | दुचाकी वाहनांची जोरदार धडक; एक ठार तर दोन जण गंभीर जखमी | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Accident,Warora,Chandrapur Live,Accident News,Chandrapur Today,Maharashtra,Chandrapur Accident News,

Chandrapur News,Chandrapur,Accident,Warora,Chandrapur Live,Accident News,Chandrapur Today,Maharashtra,Chandrapur Accident News,
दुचाकी वाहनांची जोरदार धडक

वरोरा ( Warora ) 
:- चंद्रपूर-नागपूर महामार्गावरून दोन युवक एम एच 31 आर 4310 या क्रमांकाच्या दुचाकीने नागपूरवरून चंद्रपूरकडे जात असतांना एम एच बी यु 8834 या क्रमांकाच्या ऍक्टिव्हा दुचाकीला धडक (Two-wheeler collision ) बसली. यामध्ये ऍक्टिव्हा वाहन स्वार जागीच ठार झाला. तर बॉक्सर बजाज दुचाकी स्वार दोन युवक गंभीर जखमी झाले. सदर अपघाताची घटना 2 फेब्रुवारी 2022 ला दुपारी 3.30 वाजता घडली. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार सुरू आहे.


हे देखील वाचा:

आत्महत्या | भंडारा हादरलं ! कॉलेजमधून येताच बारावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

या अपघातात ऍक्टिव्हा वाहन स्वार मधुकर राऊत वय 45 रा. एकार्जुना यांचा जागीच मृत्यू झाला. तर बजाज बॉक्सर वरील शशांक सिंग वय 20, रा. चंद्रपूर, अथर्व माधामशेट्टीवार वय 18, रा. चंद्रपूर हे गंभीर जखमी झाले आहे.

सदर मृतक मधुकर राऊत हा एकार्जुना येथून आपल्या दुचाकीने साकार नगर कडे जात असतांना नागपूरवरून येणाऱ्या दुचाकीने मृतकाचे दुचाकी वाहनाला जबर धडक दिली. यामध्ये मधुकर राऊत हा जागीच ठार झाला. मृतक हा एका फार्म हाऊस वर कामाला होता. तो एकार्जुना येथे किरायाने राहतो. घटनेच्या दिवशी तो आपल्या कामावर जात असल्याचे समजते. सदर अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.