'

चामोर्शी तालुकयातील येनापूर येथे शाळकरी मुलीचा विहिरीत आढळला मृतदेह...! - Batmi Express

0

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli  Live News,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,Chamorshi,
हि फोटो फक्त बातमी दर्शवत आहे .

गडचिरोली
:- चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येणापूर येथे 14 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची घटना दिनांक 28 फेब्रुवारी ला उघडकीस आली. सुजाता जनार्दन गोंगले वय 14 वर्ष रा येणापूर ता चामोर्शी जि गडचिरोली असे विहिरीत आढळून आलेल्या मृतक मुलीचे नाव असून ती इंदिरा गांधी विद्यालय येणापूर येथे आठव्या वर्गात शिकत होती. ( The body of a school girl was found in a well at Yenapur in Chamorshi taluka )

सविस्तर वृत्त असे की, मृतक मुलगी 26 फेब्रुवारी ला सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडली.परंतु रात्री उशिरापर्यंत ती घरी परत न आल्याने तिच्या कुटूंबियांनी शोधा शोध केली परंतु ती आढळून आली नाही. तिचा भाऊ प्रेमानंद गोंगले यांनी आष्टी पोलीस ठाण्यात सुजाता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 28 फेब्रुवारी सोमवारला सकाळी 12 वाजता तीचा मृतदेह पुरुषोत्तम राऊत यांच्या विहिरीत तरंगताना आढळून आला.

याबाबतची माहिती आष्टी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतक मुलीचा मृतदेह बाहेर काढला व आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. घटनेने कारण अद्याप अस्पष्ट असून तीने आत्महत्या केली? की तिची हत्या झाली हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×