A 13-year-old girl was gang-raped by 16 people | १३ वर्षांच्या मुलीवर १६ जणांची केला सामूहिक बलात्कार | Batmi Express

A 13-year-old girl was gang-raped by 16 people,Crime,India,India News,Rape,Rape News,१३ वर्षांच्या मुलीवर १६ जणांची केला सामूहिक बलात्कार

A 13-year-old girl was gang-raped by 16 people,Crime,India,India News,Rape,Rape News,१३ वर्षांच्या मुलीवर १६ जणांची केला सामूहिक बलात्कार
१३ वर्षांच्या मुलीवर १६ जणांची केला सामूहिक बलात्का
भरतपूर | एका अल्पवयीन १३ वर्षांच्या मुलीवर, सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी (Father Of The Girl) पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची १३ वर्षांची मुलगी १२ फेब्रुवारीला सकाळी १० च्या सुमारास, डोंगरात बकऱ्यांना चारण्यासाठी घेऊन गेली होती. ( A 13-year-old girl was gang-raped by 16 people )

बकऱ्यांना चरायला सोडल्यानंतर, ती जंगलातील सरपण गोळा करीत होती. त्यावेळी जंगलात बाईकवरुन आलेल्या पाच जणांनी तिला जबरदस्तीने पकडून, बाईकवर बसवून तिचे अपहरण केले. त्यावेळी जंगलात काही गावातील इतर मुलेही होती, त्यांनी हा घडलेला प्रकार तिच्या वडिलांना येऊन सांगितला.

१६ जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा:

त्यानंतर वडिलांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, तिचा शोध लागला नाही. त्यानंतर रविवारी सकाळी मुलगी घरी आली. त्यानंतर तिने रडत रडत घडलेला प्रकार सांगितला. १६ जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे या मुलीने तिच्या वडिलांना सांगितले. मुलीची ही स्थिती पाहून, संपतापलेल्या वडिलांनी १६ जणांविरोधात गॅंगरेप प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या आरोपींनी पहिल्यांदा मुलीला पळवून नेले आणि त्यानंतर दोन दिवस ते १६ जण या मुलीवर बलात्कार करत होते, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, या चाचणीच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.