Bramhapuri In Chandrapur Crime: पोलीस शिपायाचा विवाहित महिलेवर अत्याचार - Batmi Express

Bramhapuri In Chandrapur Crime: पोलीस शिपायाचा विवाहित महिलेवर अत्याचार,Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur News,Chandrapur,Rape,

Bramhapuri In Chandrapur Crime: पोलीस शिपायाचा विवाहित महिलेवर अत्याचार,Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur News,Chandrapur,Rape,

ब्रम्हपुरी ( Bramhapuri )
:- पाथरी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस शिपायाने ब्रम्हपुरी येथील टिळक नगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना दिनांक 19 जानेवारी रोजी उघडकीस आली असून लालश्याम बाबुराव मेश्राम वय (५१) असे अत्याचार करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव आहे. सध्या आरोपी पाथरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याचे विश्‍वसनीय माहिती आहे.

फिर्यादी अत्याचारग्रस्त महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लालश्याम बाबुराव मेश्राम याला ब्रम्हपुरी पोलिसांनी अटक केली. फिर्यादी विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लालश्याम मेश्राम यांच्या विरोधात कलम अप क्र.३०/२०२२ भारतीय दंड संहिताचे कलम३७६ (२) (n).३४५ (d (१) ५००,५०६भादवी सह कलम ६७ (अ) माहीती व तंत्रज्ञान अधिनीयम२०००चे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर घटनेचा तपास ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.