Nagar Panchayat Results: आज गडचिरोलीत ९ नगरपंचायतींची होणार मतमोजणी | Batmi Express

Be
0

Nagar Panchayat Results,Gadchiroli,Gadchiroli News,Chamorshi,Korchi,Aheri,Mulchera,Etapalli,Bhamragad,Sironcha,Dhanora,kurkheda,

गडचिरोली
:-21 डिसेंबरला जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या 9 नगरपंचायतीच्या तर 46 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुक घेण्यात आली होती. तर उर्वरित सर्वसाधारण प्रर्वगाच्या 11 जागांसाठी 18 जानेवारीला ही निवडणुक पार पाडण्यात आली. या दोन्ही टप्यात पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद असुन उमेदवारासह राजकिय पक्षांचे नजरा आता 20 जानेवारीला होणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत.

मतमोजणी दि. 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजे पासून सुरुवात होणार असून मत मोजणीची वेगवेगळ्या नगर पंचायतीची टेबल व फेऱ्या राहणार आहे. भामरागड 3 टेबल 6 फेऱ्या,अहेरी 4 टेबल 5 फेऱ्या, सिरोंचा 4 टेबल 4 फेऱ्या शेवटीचा फेरीसाठी 1 टेबल, कुरखेडा 4 टेबल 5 फेऱ्या, एटापल्ली 4 टेबल 4 फेऱ्या,

धानोरा 6 टेबल 3 फेऱ्या, मुलचेरा 6 टेबल 3 फेऱ्या,चामोर्शी 4 टेबल 5 फेऱ्या आणी कोरची 3 टेबल 6 फेऱ्या अशा प्रकारे मतमोजणी राहणार आहे. अशी माहिती नगरप्रशासन विभागाने दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->