चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस-भाजपमध्ये काट्याची टक्कर होण्याची शक्यता वर्तविली होती. काँग्रेसचे बडे नेते मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांनी प्रचाराची धूम ठोकली होती. तसेच, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक सभा गाजविल्या. वडेट्टीवार यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सावली येथे काँग्रेसने तब्बल १४ जागा जिंकल्या आहेत.  भाजपाला येथे तीन जागांवर समाधान मानावे लागले. सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसने १३ जागा जिंकल्या तर,  भाजप तीन जागांवर विजय मिळवू शकला आहे.