Suicide News: जांभळाच्या झाडाला 25 वर्षीय तरुणाचा गळफास | बातमी एक्सप्रेस

Gondia,Gondia Live News,Gondia Marathi News,gondia news,suicide,suicide news,Suicide Marathi News,जांभळाच्या झाडाला 25 वर्षीय तरुणाचा गळफास

Gondia,Gondia Live News,Gondia Marathi News,gondia news,suicide,suicide news,Suicide Marathi News,जांभळाच्या झाडाला 25 वर्षीय तरुणाचा गळफास
25 वर्षीय तरुणाचा गळफास

गोंदिया
:- ऐन दिवाळीच्या काळात युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास 25 वर्षीय तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवलं. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील फुटाना गावात घडली आहे. कैलास रामलाल कोचे असे मयत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे एकाच फांदीला वेगवेगळ्या दोन दोरींचे दोन गळफास असल्याने दोघे जण एकाच वेळी आत्महत्या करत असल्याच्या शंकेला उधाण आले आहे. ( A 25-year-old man strangled a purple tree )

काय आहे प्रकरण?

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील फुटाना गावात राहणारा 25 वर्षीय कैलास दिवाळीच्या दिवशी कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता घरुन निघून गेला होता. रात्री जवळपास दोन वाजताच्या सुमारास तो घराबाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळ होऊन गेल्यानंतरही तो घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली, त्यावेळी फुटाना ते कलुसावटोला पायदान रस्त्यालगत असलेल्या जांभळीच्या झाडावर कैलास गळफास घेतलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आला.

हेही पण वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर शहरात बर्निंग कारचा थरार....

एकाच झाडाला दोन फास...

विशेष म्हणजे ज्या जांभळाच्या झाडाच्या फांदीवर तरुणाने गळफास घेतला, त्या फांदीला वेगवेगळ्या दोन दोरीने दोन गळफास बांधलेले होते. त्यापैकी एकाला मृतक कैलास कोचे याचा मृतदेह लटकलेला होता तर दुसरा गळफास रिकाम्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आला. तसेच त्याचा मोबाईल खिशात न ठेवता झाडाखाली ठेवलेला होता.

कैलाससोबत कोणी माघार घेतली, गावात चर्चा त्यामुळे कैलाससोबत आत्महत्या करणारी आणखी कोणी व्यक्ती होती का, असल्यास कोण, अशा एक ना अनेक चर्चा गावात सुरु झाल्या आहे. याबाबत पोलीस स्टेशन चिचगड येथे फिर्याद नोंद करण्यात आली असून फौजदारी कलम 174 अन्वये पुढील तपास चिचगड पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.