नीट परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणुन विद्यार्थिनींने केली आत्मह्त्या - News Pic |
राजुरा: राजुरा शहरातील रामनगर वसाहतीत राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने नीट परीक्षेत आपल्या सोबत असणाऱ्या विद्यार्थिनी पेक्षा कमी गुण मिळाले म्हणून आपल्याच घरात ओढणीचा फास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ( Chandrapur Suicide News )
केवळ कमी गुण मिळाले. याकारणामुळे एका हुशार विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना समानमन सुन्न
दिवाळीच्या वेळी घडलेल्या या दुदैवी घटनेन राजुरा येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. कृष्णा नंदकिशोर पिलारे (१९) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. कृष्णा हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील शिवाजी शाळेत झाले. त्यानंतर तीने नांदेड येथे नीट चा अभ्यास केला. या निकालात तिला ४७२ गुण मिळाले, मात्र आपल्या मैत्रिणीपेक्षा कमी गुण मिळाल्याचे शल्य तिला झाले नाही.
घटनेच्या दिवशी ती व तिची मोठी बहीण परच्या मजल्यावर पुस्तक वाचत होत्या. पण मोठी बहीण काही कामासाठी त्या खोलीतून निघताच कृष्णाने पख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली ( Chandrapur Suicide News ) . अत्यंत हुशार व सुस्वाभी असलेल्या या विद्यार्थिनीच्या जाण्याने राजुरा येथील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.