फटाके उडविण्यास व फोडण्यास मनाईचे आदेश - File Pic
Bhandara News: भंडारा जिल्ह्यात दि. २ ते ९ नोव्हेंबर २०२१ ९ पर्यंत दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दिवाळीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर लोक मोठ्या प्रमाणात फटाके उडवितात व फोडतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवास धोका निर्माण होऊन सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ( Prohibition order blow up and detonate firecrackers )
हे सुद्धा वाचा: नीट परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणुन विद्यार्थिनींने केली आत्मह्त्या
शाळा, कॉलेज, रुग्णालय, न्यायालय ईत्यादी सार्वजनिक ठिकाणी जे शांतता झोनमध्ये येतात, त्या भागात १०० मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. फटाक्याची जे लडी व असे फटाके जे मोठ्या प्रमाणात प्रदुषित हवा, आवाज व घनकचरा तयार करतात, अशा प्रकारच्या तत्सम फटाके फोडण्यास दि. २ ते ९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मनाई करण्यात आली आहे. सोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उडणारे दिवे, कंदिल आदी उडविण्यास मनाई करण्यात येत आहे. हरीतलवाद व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्रचलित आदेश व निर्देशाचे पालन करण्याविषयी आदेशाचे पालन करावे, असे अतिरीक्त जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.