Rape News: लग्नाचे आमिष दाखवून, 20 वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार! | बातमी एक्सप्रेस

Amravati,Rape,Rape News,Marathi Batmya,Marathi News,Amravati News,Crime,crime news,Rape News: लग्नाचे आमिष दाखवून, 20 वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार!

Amravati,Rape,Rape News,Marathi Batmya,Marathi News,Amravati News,Crime,crime news,Rape News: लग्नाचे आमिष दाखवून, 20 वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार!
20 वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार!

Rape News / अमरावती
:- मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. अत्याचाराच्या घटनांत आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. अमरावतीत एका 20 वर्षीय तरुणीवर तिच्या ओळखीतील 25 वर्षीय तरुणाने बलात्कार केला आहे. आरोपी तरुणाने लग्नाचं आमिष दाखवत पीडितेवर अनेकदा जबरदस्तीने अत्याचार केला आहे. दरम्यान पीडितने लग्नासाठी विचारलं असता, तिची फसवणूक करत लग्नाला नकार दिला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ( 20-year-old girl repeatedly raped for marriage )

पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित घटना अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी येथे घडली आहे. 

हे सुद्धा वाचा:  चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय आरोपी तरुण आणि 20 वर्षीय फिर्यादी तरुणी गेल्या काही काळापासून एकमेकांना ओळखत होते.  दरम्यान दोघांच्या ओळखीच रुपांतर चांगल्या मैत्रीत झालं. यातूनच आरोपी तरुणाने पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीनं वेळोवेळी लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत. गेल्या बऱ्यांच दिवसांपासून आरोपी पीडित तरुणीचं लैंगिक शोषण करत होता.

पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाची मागणी केली असता, आरोपीनं लग्न करण्यासाठी नकार दिला. आरोपीचा खरा चेहरा उघड झाल्यानंतर 20 वर्षीय पीडित तरुणीने लोणी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून लोणी पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.