Sangli: एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरीच मृत्यू | Batmi Express

एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरीच मृत्यू,Sangli,Marathi Batmya,Sangli News,Marathi News,

एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरीच मृत्यू,Sangli,Marathi Batmya,Sangli News,Marathi News,
एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरीच मृत्यू - News Pic

Sangli
: सांगलीमध्ये आहे का एसटी कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. राजेंद्र पाटील, वय  47 असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.मिरज तालुक्यातील कवलापूर याठिकाणी राहत्या घरामध्ये राजेंद्र पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला,आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. (st-workers-die-of-heart-attack--at-his-residence-in-sangli )

राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होऊ लागले आहे. व सांगलीतही गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत.आता या संपावर असणाऱ्या एका एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

हे पण वाचा:  धक्कादायक! सुतळी बाम्ब स्फोटात सहा जण जखमी 

राजेंद्र निवृत्ती पाटील, वय ४७ असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.पाटील हे सांगली आगारामध्ये वाहक पदावर कार्यरत होता.मिरज तालुक्यातल्या कवलापूर या ठिकाणी राहत्या घरी राजेंद्र पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला,त्यामुळे त्यांचं निधन झाले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये खळबळ उडाली आहे.तरी या एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईक व एसटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.