तरुणाची दगडाने ठेचून हत्या - पोलिस ( File Pic )
Nagpur Crime: नागपूर येथील एमआयडीसी, वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिजिटल झोनजवळ गुरुवारी सकाळी डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाची ओळख सध्या अपस्ट आहे. तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्यासारखे दिसत आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. ( Nagpur Crime )
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.