 |
गडचिरोली विभागातील ३४ कर्मचारी निलंबित - File Pic |
गडचिरोली : एसटी च्या गडचिरोली विभागाने काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या ३४ कर्मचाऱ्याना निलंबित केल्याने दोन दिवसात निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ४८ वर पोहोचली आहे. ( Gadchiroli ST Strike )
प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यानी दिवाळीच्या आधीपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर असल्याने बसेस बंद असून प्रवाशांची गैरसोय होत आहे.त्यामुळे शासनाने हे आंदोलन दडपण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसापासून आतापर्यंत ४८ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. यात गडचिरोली आगारातील १६, अहेरी आगारातील ११, ब्रम्हपुरीतील ५, विभागीय कार्यालयातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे एसटी कर्मचाऱ्याने स्पष्ट केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.