वशीकरण करून तांत्रिकांचा तरुणीवर बलात्कार |
कानपुर, खरे प्रेम मिळविण्यासाठी तांत्रिकडे गेलेल्या तरुणीवर तांत्रिकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबा मनोहर यासह एका महिलेला अटक केली आहे. पीडित तरुणीचा प्रियकर दुसऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला, त्यामुळे तिचे प्रेम वशीकरण करून परत मिळविण्याच्या भूलथापा तांत्रिकाने दिल्या. या विधीसाठी तांत्रिकाने तरुणीला विवस्त्र होण्यासाठी सांगितले. तरुणी विवस्त्र होताच तांत्रिकाने तिच्यावर बलात्कार केला.
हे नक्कीच वाचा: नागपूर १०वी च्या विद्यार्थिनीशी स्कूल व्हॅलचालकाची सलगी, आईला सापडला नको त्या अवस्थेत आणि…
या घटनेनंतर तरुणीने पोलीस स्थानक गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास करीत तांत्रिक आणि त्याच्या जोडीदार महिलेला ताब्यात घेतले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.