चंद्रपूर - वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार | Batmi Express

चंद्रपूर - वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Batmi Express

चंद्रपूर - वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Batmi Express
चंद्रपूर - वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

चंद्रपूर
:- आज पासून सुरू झालेल्या अखिल भारतीय व्याघ्र लाईन सर्वेक्षण करण्यास गेलेल्या स्वाती ढुमने हिला वाघाने हल्ला करून ठार  Female forest ranger killed in Waghini attack ) केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी आठचे सुमारास घडली ही घटना ताडोबा अभयारण्याच्या कोलारा वनक्षेत्रात 97 पाणवठा जवळ घडली या घटनेमुळे वनकर्मचार्यात भीतीचे वातावरण झाले असून हळहळ व्यक्त केले जात आहे.

 हे नक्कीच वाचा: चंद्रपूर - तीन मुलांना सोडून आईचे प्रियकरासोबत फरार ; न्यायासाठी नवऱ्याची कैफियत

दिनांक 20 नोव्हेबर ते 26 नोव्हेबर पर्यंत सर्व वनक्षेत्रात व्याघ्र सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे ट्रान्झिट लाईन द्वारे सर्वेक्षण केले जात त्यासाठी आज सकाळीच ताडोबा कोर वनपरीक्षेत्रातील वनरक्षक स्वाती ढुमणे ही इतर सहकारी वनकर्मचारी मिळून जात होते वाटेत दबा धरून असलेला वाघाने अचानक हल्ला केला आणि ओढीत नेला यात त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱयांस देण्यात आली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.

या घटनेमुळे वनकर्मचार्यात भीतीचे वातावरण झाले आहे ही महिला वनरक्षक मागील वर्षीच्या विरुर वनपरिक्षेत्रातून बदली झाली होती,त्यांना दोन लहहण अपत्य आहे या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.