नागपूर : ९ वर्षीय मुलीचा विनयभंग ( Molesting 9-Year-Old Girl ) केल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने ४१ वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी ( १९ नोव्हेंबर रोजी ) गांधीसागर तलावात उडी मारून आत्महत्या केली. नागपूर: नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग
मृत अयुब इब्राहिम खान याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे माझं समाजात अपमान होईल असं त्याला वाटलं होत आणि त्याने मुलीच्या आईला धमकीही दिली होती की जर त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली गेली तर आपण आपले जीवन संपवणार.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आरोपी अयुब खान याने 9 वर्षांच्या मुलीचा विनयभंग ( Molesting 9-Year-Old Girl ) केला, जेव्हा ती आपल्या आजोबांच्या मालकीच्या दुकानात गेली होती. आरोपी दुकानात काम करत होता. त्यानंतर, मुलीच्या आईने अयुब खानवर गुन्हा दाखल केला होता आणि तहसील पोलिसांनी अयुब खानवर आयपीसीच्या कलम 354, 506 नुसार लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला होता आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला होता.
दरम्यान, अयुब खान यांचा मृतदेह गांधीसागर तलावातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात धडक दिली आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी आत्तापर्यंत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा कसून पुढील तपास सुरू आहे.