'
30 seconds remaining
Skip Ad >

ST कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने अकोलाचं नाही तर महाराष्ट्र सुद्धा हादरला | Batmi Express

0

Buldana,Akola,Mumbai,Mumbai News,Akola,ST Employees Strike,ST Employee Suicide
ST कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने अकोलाचं नाही तर महाराष्ट्र सुद्धा हादरला

बुलढाणा (Buldhana)
: महाराष्ट्र भर (Maharashtra LatestNews) एसटी (ST Employees Strike) कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे. अनेक कामगार हे संपावर गेले आहेत. एसटी कामगारांच्या मागण्या घेऊन कामगार आंदोलनं करीत आहेत. त्यात सरकारने संपकरी कामगारांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील विशाल अंबलकार नामक एसटी कामगाराने आपलंही निलंबन होईल या भीती पोटी विषारी औषध प्रशासन करून (ST Employee Suicide) आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

 हे नक्कीच वाचा: चंद्रपूर - तीन मुलांना सोडून आईचे प्रियकरासोबत फरार ; न्यायासाठी नवऱ्याची कैफियत

त्यावेळी त्याला प्रथम खामगाव आणि नंतर अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 24 तास मृत्यूशी झुंज देत असलेल्या विशालने शेवटचा श्वास घेतला. त्यामुळे अकोला जिल्हा हादरला.

आज त्याच्या पार्थिवावर त्यांच्या गावी माटरगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घरचा करता पुरुष निघून गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त केला.

दरम्यान एसटी महामंडळ (Maharashtra State Transport) राज्य सरकारमध्ये विलगीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आपल्या संपावर (ST Employees Strike)ठाम आहे. हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच आहे. अशातच एसटी महामंडळाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाच वेळी 2296 रोजंदार कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याची विनंती केली होती. पण, एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहे. त्यामुळे आता महामंडळाने कारवाईला सुरुवात केली आहे. एसटी महामंडळाने संपाविरोधात मोठं पाऊल उचलले आहे. एकाच वेळी २२९६ रोजंदार कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. या कर्मचाऱ्यांना 24 तासांचे अल्टीमेटम दिले आहे. कामावर हजर व्हा नाही तर सेवा समाप्त करण्यात येईल, असे प्रशासनानं नोटीसीद्वारे कळवले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×