'
30 seconds remaining
Skip Ad >

मुल: ग्रामपंचायतीत लाखोचा भ्रष्टाचार; माजी सरपंच व सचिवांनी लावला निधीला चुना | Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Mul,Mul News,मुल: ग्रामपंचायतीत लाखोचा भ्रष्टाचार
मुल: ग्रामपंचायतीत लाखोचा भ्रष्टाचार;

मुल
:- मुल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नांदगाव येथे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार विद्यमान सरपंच हिमानी दशरथ वाकुडकर यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली असून, या गंभीर घटनेची तक्रार खुद्द संवर्ग विकास अधिकारी मुल यांनी दिली असून एफआयआर दाखल झाला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पोलीस स्टेशन मुल येथे दिलेल्या तक्रारीत सरपंच हिमानी दशरथ वाकुडकर यांनी म्हटले आहे की, तत्कालीन ग्रामसेवक उत्तम बावनथळे आणि सरपंच मंगेश मगनुरवार या दोघांनी मिळून स्वच्छ भारत मिशन व जनसुविधा योजनेचा चालू कार्यालयीन रेकॉर्ड, ज्यामध्ये कॅशबुक, चेक बुक, ठराव बुक, टेंडर फाइल्स, बँक पासबुक, पत्र व इतर कागदपत्रे काम न करता गैरव्यवहार करून निधीचा अपहार केला असल्याने फेब्रुवारी २०२१ पासून गहाळ केलेला आहे.

 हे नक्कीच वाचा: चंद्रपूर - तीन मुलांना सोडून आईचे प्रियकरासोबत फरार ; न्यायासाठी नवऱ्याची कैफियत

विद्यमान सरपंच हिमानी वाकुडकर यांनी संवर्ग विकास अधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार करून सुद्धा ग्रामपंचायतीचा रेकार्ड देण्यास हेतुपुरस्कर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीतून केलेला आहे.

तत्कालीन सरपंच मंगेश मगनुरवार व सचिव उत्तम बावनथडे यांनी संगनमताने जनसुविधा योजनेचे २२ लाख रुपये व स्वच्छ भारत मिशनचे असे एकूण ३७ लाख ३६ हजाराचा अपहार केलेला आहे. या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विद्यमान सरपंच हिमानी दशरथ वाकुडकर यांनी पालक मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली शेठी, संवर्ग विकास अधिकारी यांचेकडे दाखल केलेल्या तक्रारीतून मागणी केलेली आहे. दरम्यान पोलिसांची चौकशी सुरू असून सरपंच हे भूमिगत झालेले असल्याने चौकशीत अडथळा निर्माण होत असल्याची नागरिकांमध्ये भावना व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×