सावरगाव येथे संपूर्ण गावाची श्रमदानातून ग्रामस्वच्छता | Batmi Express

Bhandara,सावरगाव येथे संपूर्ण गावाची श्रमदानातून ग्रामस्वच्छता ,Bhandara Batmya,Bhandara Live,Bhandara Marathi News,Bhandara News,

Bhandara,सावरगाव येथे संपूर्ण गावाची श्रमदानातून ग्रामस्वच्छता ,Bhandara Batmya,Bhandara Live,Bhandara Marathi News,Bhandara News,
सावरगाव येथे संपूर्ण गावाची श्रमदानातून ग्रामस्वच्छता

लाखांदूर तालुक्यातील सावरगाव येथे संपूर्ण गावाची श्रमदानातून ग्रामस्वच्छता रविवारी करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत संपूर्ण गावातील युवकांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबविला. यामुळे शासनाचा कुठलाही पैसा खर्च न करता लोकसहभागातून श्रमदान करून गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढाकार घेतल्याने ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावात तारीख 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान एकनाथी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

तालुक्यातील सावरगाव हे गट ग्रामपंचायतमध्ये मोडत असल्याने गावाच्या स्वच्छतेकरिता ग्रामपंचायचा निधी पाहिजे त्या प्रमाणात खर्च करता येत नाही त्यामुळे शासनाची स्वच्छता मोहीम ही या गावासाठी मदतगार ठरू शकले नाही. 

 हे नक्कीच वाचा: मुल: ग्रामपंचायतीत लाखोचा भ्रष्टाचार; माजी सरपंच व सचिवांनी लावला निधीला चुना

त्यामुळे गावातील युवकांनी एकत्र येऊन पाच दिवसाच्या भागवत सप्ताहाचे आयोजन केले. या निमित्ताने ग्रामस्थ एकत्र येऊन गावाची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेऊन श्रमदानातून संपूर्ण गावाची स्वच्छता रविवारी पहाटेपासूनच करण्यात आली होती. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.