Chandrapur Suicide News: विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या | Batmi Express

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या,Batmi Express,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Suicide News

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या,Batmi Express,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Suicide News
विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

राजुरा
:- राजुरा तालुक्यातील सिंधी येथील शेतकरी सोमा मल्ला दामेलवार वय वर्ष ६१ याने स्वतः च्या सर्वे नंबर २६६ मध्ये दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ रोजी सततच्या नापिकी ला कंटाळून नैराश्यातून आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केले. ( Farmer commits suicide by consuming poison )

सदर घटनेची माहिती मुलगा राजकुमार दामेलवार याला झाली. त्याने काही स्थानिक नागरिकांची मदत घेऊन ताबडतोब सरकारी दवाखाना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दिनांक ८ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजता सोमा दामेलवार यांचे दुःखद निधन झाले.

हे पण वाचा: चंद्रपूर जिल्हयात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

त्याचेवर बँक ऑफ इंडिया विहिरगाव आणि सीडीसीसी बँक विरूर स्टेशन चे कर्ज असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. त्यामुळे नापिकी सोबतच कर्ज फेडण्यात येत असलेली असमर्था सुध्दा या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.