ब्रम्हपूरी शहरातील राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या - News Pic
Chandrapur News: राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिल्यानंतर आता राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन सुरु असतानाच राज्यातील आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ( ST employee commits suicide in Chandrapur district )
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी आगारातील सत्यजित ठाकूर या कर्मचाऱ्याने ब्रम्हपूरी शहरातील राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. गेले तीन दिवस कुणाच्याही संपर्कात ठाकूर नव्हते, अशी माहीती मिळत आहे. शेजाऱ्यांनी दार ठोठावले असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दार तोडल्यानंतर ठाकूर हे घरामध्ये निपचीत पडले होते. घटनेची माहीती ब्रम्हपूरी पोलीसांना देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात या आंदोलनाला 100 टक्के प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर अद्यापही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे राज्य सरकार या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रकरणी नेमकी काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.