आत्महत्या करू नका, संप मागे घेऊ नका
Sangli : सांगलीच्या इस्लामपूर बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका वृद्ध महिलेने एसटी कर्मचाऱ्यांबद्दल असणारी तळमळ आणि काँग्रेस आघाडी सरकारबद्दल व्यक्त केलेल्या संतापाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या आजीबाईंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला शिव्याशाप देत, एसटी कर्मचाऱ्यांना आता माघार नको, असे आवाहन करत आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. ( Don't commit suicide, don't call off the strike ... Grandmother's support for ST strike )
अस्सल गावरान शैलीतील आजीचा संताप आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रति असणारे प्रेम या व्हिडिओमधून व्यक्त झाले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आजीबाईचा हा व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे.