राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा आज चंद्रपूर जिल्हा दौरा - File Pic |
Chandrapur News: राज्याचे नगरविकास, ऊर्जा ,आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चं
शनिवार दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता तळोधी-बाळापुर ता. नागभीड येथे आगमन व साई मंदिर सभागृह येथे आयोजित आदिवासी समाज बांधवांच्या मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे आगमन व नियोजन भवन सभागृह येथे विविध विषयांबाबत आढावा बैठक. दुपारी 1.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे जनता दरबार.
दुपारी 2.45 वाजता जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे आगमन व जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता भटाळी खुली कोळसा खाण परिसर येथे महानिर्मिती तर्फे आयोजित कोळसा पाईप कन्व्हेअर लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर कडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता हिराई गेस्टहाउस, ऊर्जानगर येथे ऊर्जानगर-दुर्गापुर, नगरपरिषद संघर्ष समिती यांच्यासमवेत चर्चा. सायंकाळी 6 वाजता ऊर्जानगर, चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.