Gadchiroli Police Naxals Clash: गडचिरोली पोलीस-नक्षल मध्ये मोठी चकमक, 26 नक्षली ठार | Batmi Express

Gadchiroli Police Naxals Clash,गडचिरोली पोलीस-नक्षल मध्ये मोठी चकमक,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli live,Gadchiroli,Gadchiroli News

Gadchiroli Police Naxals Clash,गडचिरोली पोलीस-नक्षल मध्ये मोठी चकमक,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli live,Gadchiroli,Gadchiroli News
Gadchiroli Police Naxals Clash: गडचिरोली पोलीस-नक्षल मध्ये मोठी चकमक - News File Pic

गडचिरोली
:- जिल्ह्यातील ग्यारापत्ती – कोटगुल या घनदाट जंगलात आज सकाळी पोलीस नक्षलवादी मध्ये भीषण चकमक झाल्याची घटना घडली आहे. यात 26 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे
.  ( Gadchiroli Police Naxals Clash पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  चकमकी  दरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील यामध्ये जखमी झाले असून त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरने तात्काळ नागपूरला  हलवण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं गडचिरोल पोलिसांनी सांगितलं आहे. 

जंगलात सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात पोलिसांनी सुरू केले आहे. नक्षल चे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील ग्यारापत्ती – कोटगुल जंगल भागात पोलीस पथक गस्तीवर असतांना हि चकमक झाली आहे. यात नक्षल वादी गोळीबार मध्ये ठार झाले आहेत. या बाबत महाभारत न्यूज ने घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांकडून माहिती असता.  ( कुख्यात नक्षली मिलिंद तेलतुंबडे ठार )

जिल्ह्यातील ग्यारापत्ती – कोटगुल जंगल भागात पोलीस नक्षलवादी मध्ये चकमक झाल्याची माहिती दिली परंतु अधिकची माहिती देण्याचे टाळले. या चकमकी बाबत गोपनीयता बाळगली जात आहे. या घटनेमुळे या जिल्ह्यात नक्षलचळवळ हे सक्रीय असल्याचे सिद्ध होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.