SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचे ऑनलाईन व्यवहार तीन दिवस बंद |
SBI: आजपासून स्टेट बँक ऑफ इंडियाचे ( SBI ) ऑनलाईन व्यवहार तीन दिवस बंद राहतील. SBI ने दिलेल्या माहितीच्या अनुसार काही तांत्रिक देखभालीसाठी ऑनलाईन बँकेच्या काही सेवा ०९, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी बंद राहतील म्हणजे तब्ब्ल तीन दिवस ऑनलाईन व्यवहार बंद राहणार अशी माहिती देण्यात आली आहे. (state-bank-of-india-online-transactions-closed-for-three-days )
ऑनलाईन व्यवहार मध्ये कोणती सेवा बंद ?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनुसार ( SBI ) इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा तांत्रिक देखभालीसाठी बंद असणार आहे.
SBI ऑनलाईन व्यवहार कधी असतील बंद ?
स्टेट बँक ऑफ इंडियाचे ( SBI ) ऑनलाईन व्यवहार सुरवातीला ०९ ऑक्टोबरच्या रात्री १२:२० ते ०२:२० पर्यंत आणि नंतर १० आणि ११ ऑक्टोबर च्या रात्री ११:२० ते १:२० पर्यंत SBI ऑनलाईन सेवा बंद राहतील.