Gondwana University: गोंडवाना विद्यापीठाने राबविले स्वच्छता अभियान; प्लॉस्टीकचा वापर टाळण्याचे आवाहन | बातमी एक्सप्रेस गडचिरोली

Gondwana University,Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,Marathi Batmya

Gondwana University,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli live,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,Marathi Batmya
प्लॉस्टीकचा वापर टाळण्याचे आवाहन - File Pic

Gondwana University:
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्थानीक गोंडवाना विद्यापीठाने आज २८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठ परीसरात स्वच्छता अभियान राबविले. प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी सकाळी ११ वाजता हिरवी झेंडी दाखवून मेगा ड्राइव्हला सुरुवात केली. याप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल चिताडे, रा. से.यो. विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे, रा. से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद जावरे, प्रा. वैमव मसराम आदी उपस्थित होते. ( Sanitation campaign implemented by Gondwana University )

गोंडवाना विद्यापीठ संलग्नित गडचिरोली शहरातील २५० रा. से. यो. स्वयंसेवकांनी विद्यापीठ परिसर, बसस्थानक, रेल्वेस्थानक परीसरात स्वच्छता अभियान कार्यक्रमांतर्गत प्लॉस्टीकचा एकल वापर, प्लॉस्टीक आणि कचरा संकलनावर मेगा ड्राइव्ह उपक्रमा अंतर्गत रा. से. यो. स्वयंसेवकांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करून स्वच्छतेच्या दारी आरोग्य वास करी असा संदेश दिला.

यावेळी३१ ऑक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनानिमीत्य राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. श्याम खंडारे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.