| ट्रॅक्टर खड्ड्यात उलटल्याने ट्रॅक्टर वरील दोन इसमांचा जागीच मृत्यू |
Gadchiroli Accident News - गडचिरोली:- देचली वरून छल्लेवाडाला जाणारा ट्रॅक्टर खड्ड्यात पडून उलटल्याने ट्रॅक्टर वरील दोन इसमांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी जिमलगट्टा पासून 2 किमी वर देचली रोड वर घडली आहे. मत्यू झालेल्या इसमांची नावे सुनील महेश अटकर रा. रसपल्ली व ट्रॅक्टर चालक अंकीत सिडाम रा. कोडसेलगुडम असे असून ट्रॅक्टर मालक हा तेलंगणा मधील असल्याची माहिती आहे. ( Tractor two Ismas died on the spot )
आज सकाळच्या सुमारास देचली येथे शेतीच्या कामावर असलेल्या फार्मर्ट्रक कंपनीचा ट्रॅक्टर काम आटोपून निघाला होता. जिमलगट्टा पासून 2 किमी अलीकडे असताना ट्रॅक्टर चालकाचे संतुलन जाऊन खड्ड्यात पडून उलटला. त्यामुळे ट्रॅक्टर चालक अंकित सिडाम व सुनील अटकर ट्रॅक्टर च्या खाली दबले गेले. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. जिमलगट्टा येथील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचुन घटनेचा पंचनामा केला आहे.


कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.