Crime News | प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीचा खुन | बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

Crime News | प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीचा खुन,बातमी एक्सप्रेस चंद्रपूर,Crime News ,Crime News Marathi

Crime News | प्रियकराने केला प्रियसीच्या पतीचा खुन,बातमी एक्सप्रेस चंद्रपूर,Crime News ,Crime News Marathi
Crime News | प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीचा खुन

Crime News: पडोली येथे सिनरी परिसरात १६ ऑक्टोबर रोजी सापडलेल्या मृतक इसमाची ओळख पटली असून त्याचे नाव राजु अनंत मलिक (४५) असे आहे. तसेच राजुचा खुन त्याच्या पत्नीच्या प्रियकरानेच केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. आरोपी मृतकाची पत्नी व प्रियकर जितेंद्रसि मंडारी याला पोलिसांनी अटक केली. मयत राजु मलिक व त्याची पत्नी याच्यासोबत जितेंद्रसिंग भंडारी यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.  त्यावरून जितेंद्रसिंग मडारी याला दुर्गापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यास ताब्यात घेवून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व पो. उपनि संदीप कापडे यांनी त्याचेकडे कसून चौकशी केली परंतू संशईत ईसम हा उडवा उडविचे उत्तरे देत होता. ( crime-news-lover-murdered-the-lovers-husband )

त्या नंतर त्याची उलट सुलट चौकशी केली असता त्यावरून त्याने दिलेल्या माहिती वरून यातील संशईत इसमानेच खुन केला असल्याचा संशय बळावला त्यानंतर त्याला विश्वासात घेवून पोलीस भाषेत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे मयता बाबत चौकशी केली असता त्याचे मयताचे पत्नी बरोबर मागील ५ वर्षापासू, प्रेमसंबंध होते. ती मागील १ वर्षांपासून मूलासह तिचे माहेरी कान्केर राज्य छत्तीसगड येथे गेलेली आहे.

Read Also: धक्कादायक! सोयाबीन काढत असताना थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने शेतमजुराचा मृत्यू

त्या दोघांचे प्रेमसंबंधामध्ये मयत इसम हा अडसर होत असल्याने त्याला ठार मारण्याचा निश्चय आरोपी ईसमाने केला. त्यावरून दि. १५ ऑक्टोबर चे रात्री ७ वा. दरम्यान आरोपीने मृतकास सिनरी वर्ल्ड येथील निर्जन परीसरात नेवून त्याला दारू पाजली व त्यास लोखंडी रॉडने डोक्यावर मारून जिवानीशी ठार मारल्याचे कबुल केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.