Suicide News | ट्रॅव्हल्स चालकाची गळफास घेत आत्महत्या | बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

Suicide News,Suicide Marathi News,Suicide News Chandrapur,Chandrapur News,ट्रॅव्हल्स चालकाची गळफास घेत आत्महत्या,Batmi Express,बातमी एक्सप्रेस चंद्रपू

Suicide News,Suicide Marathi News,Suicide News Chandrapur,Chandrapur News,ट्रॅव्हल्स चालकाची गळफास घेत आत्महत्या,Batmi Express,बातमी एक्सप्रेस चंद्रपू
Suicide News | ट्रॅव्हल्स चालकाची गळफास घेत आत्महत्या - File Photo

चिमूर
नगर परिषद क्षेत्रातील वडाळा ( पकू)  येथील ट्रॅव्हल्स चालक म्हणून काम करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव नितेश सुरेश शेरकी असून तो २९ वर्षाचा आहे. आत्महत्येचे कारण समजू  शकले नाही. ( Travels driver commits suicide by strangulation )

मृत नितेश शेरकी याची आई व पत्नी रात्री काही अंतरावर असलेल्या गरवाचा कार्यक्रम पाहायला गेल्या होत्या तर वडील सुरेश शेरकी हे पानठेल्यावर गेले होते. घरी कुणीही नसल्याचे पाहून नितेशने बेडरूममध्ये पाळण्याच्या दोराने गळफास लावला. 

Read Also: प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीचा खुन 

आई आणि पत्नी घरी आल्यानंतर दार आतून बंद असल्याने दार खोलण्यास आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दाराच्या फटीतून आत पाहिले असता नितेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. वडिलांनी दार तोडून आत प्रवेश केला. नितेशला तातडीने उपचाराकरिता उप जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी नेले. करून नितेशला मृत घोषित केले. उपपोलिस निरीक्षक अलीम शेख पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला. 

मृताच्या मागे आई, वडील, पत्नी तथा अडीच वर्षांची मुलगी आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात आलीम शेख करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.