Bramhapuri Suicide: ब्रम्हपुरी येथील पोलीस स्टेशनच्या जवळील तलावात विवाहितेची आत्महत्या | बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

Bramhapuri Suicide, Bramhapuri News,Bramhapuri Marathi,ब्रम्हपुरी येथील पोलीस स्टेशनच्या जवळील तलावात विवाहितेची आत्महत्या, बातमी एक्सप्रेस चंद्रपूर

Bramhapuri Suicide, Bramhapuri News,Bramhapuri   Marathi,ब्रम्हपुरी येथील पोलीस स्टेशनच्या जवळील तलावात विवाहितेची आत्महत्या, बातमी एक्सप्रेस चंद्रपूर
Bramhapuri Suicide: ब्रम्हपुरी येथील पोलीस स्टेशनच्या जवळील तलावात विवाहितेची आत्महत्या

ब्रम्हपुरी
:-  ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या जवळील कोट तलावात वाल्मिक नगर येथील एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली.  मृतक महिलेचे नाव रेणुका अभुजित रामटेके वय 25 वर्ष असून ती मानसिक रुग्ण असल्याचे समजते. दिनांक ९ आक्टोबर ला सकाळी १० वाजता दरम्यान रेणुका अभिजित रामटेके वय २५ वर्ष रा. दहेगाव ता. लांखादुर जि. भंडारा हिने  कोट तलावात आत्महत्या केल्याची  घटना उघडकीस आली.  ( Bramhapuri Suicide)

हेही वाचा: लाखांदूर: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षापासून बलात्कार

सदर मृतक रेणुका हीचे दोन वर्षा अगोदर लाखांदूर तालुक्यातील दहेगाव येथील अभिजित रामटेके यांच्या सोबत विवाह झाला होता. पण काही दिवसामध्ये रेणुकाच्या डोक्यात मानसिक फरक वाटायला लागले. त्यामुळे तिला उपचारासाठी अनेक डॉक्टर कडे नेण्यात आले होते. 

तेव्हापासून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तिच्यावर उपचार सुरू होते. आठ दिवसा अगोदर तिला औषध-उपचारासाठी वडील मनोज सखाराम गोंडाने यांच्या कडे (माहेरी) आणुन दिले होते. एका महिलेने आत्महत्या( Bramhapuri Suicide) केल्याची  माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला मिळताच लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले व (नावेने) शोध मोहीम सुरू केली.

Corona Latest News: मागील 24 तासात जिल्ह्यात 5 कोरोनामुक्त, 1 पॉझिटिव्ह

तब्बल तीन तासाने रेणुका चा मुत्युदेह सापडला. सदर मुत्युदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून मर्ग दाखल करण्यात आले. व मुत्युदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले. सदर घटनेचा  तपास उप पोलिस निरीक्षक सुरेद्र उपरे व नरेश रामटेके , प्रकाश चिकराम, योगेश शिवनकर यांचेकडून केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.